शासकीय ज्वारी केंद्र सुरू करण्याची प्रहार संघटनांनी केली मागणी

जावेद शाह अंजनगाव सुर्जी न्यूज 

 सन 2025-2026 शासकिय ज्वारी खरेदी शेतकऱ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीन खरेदी विक्री सह, संस्था अंजनगाव सूर्जी येथे नोंदणी केलेली आहे. परतु अद्याप पर्यंत ज्वारी खरेदी सुरु झालेली नाही. तसेच ज्वारी उत्पादक शेतकरी ज्वारी खरेदी सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

तरी लवकरात लवकर ज्वारी खरेदी सुरु करण्यात यावी जेणे करून शेतक-याची गैरसोय होणार नाही. तरी शेतकऱ्यां प्रती आस्थापुर्वक जाणिव ठेवून ज्वारी खरेदी तात्काळ सुरु करावी हि येत्या 7 दिवसात खरेदी सुरू झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची व संबंधित अधिकाऱ्याची राहील.असे निवेदन अंजनगाव सुर्जी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन देते वेळी प्रहार उपजिल्हा प्रमुख शंभुभाऊ मालठाणे, बाळूभाऊ रोंगे, बाला शेरकर,मोहम्मद सिद्दीकी,संजय चोरे, संदीप देशमुख, अमर महाजन, अमोल बोबडे, जनार्दन बोन्द्रे, छोटू अढाऊ, गोपाल शिंगणे,उमर अब्दुल्ला, मो. नदीम, दत्ता ढोक, मोहम्मद नाजीम, बाळू मोहोड, मोहम्मद नासिर, अमीन, इरफान, सलाम, मोहम्मद रिहाना.. हे उपस्थित होते